कांदा निर्यातीला दुप्पट सबसिडी, राज्यात कांद्याचे भाव वाढू शकतात

Foto

कांदा निर्यातीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या सबसिडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. निर्यातीसाठी देण्यात येणारी सबसिडी ५ वरून १० टक्के करण्यात येणार आहे. त्यामुळे बाजारामध्ये कोसळलेले कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे.

 

 

कांद्याचे भाव गडगडल्याने आधीच पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाच्या कचाट्यात अडकलेला शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मागील दोन महिन्यांपासून भावामध्ये घसरण सुरूच असल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यसरकारकडून प्रतीक्विंटल २०० रुपये अनुदान घोषित करण्यात आले होते. मात्र तरीही कांद्याच्या भावामध्ये वाढ होत नसल्याने निर्यात सबसिडी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker